Amarnath Yatra 2025 संदर्भात आली मोठी माहिती, पहलगाम घटनेनंतर सुरक्षेसंदर्भात कडक नियम

Amarnath Yatra 2025

जम्मू आणि कश्मीर प्रशासनाने 2025 सालच्या अमरनाथ यात्रेच्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व यात्रा मार्गांना ‘नो-फ्लायिंग झोन’ म्हणून जाहीर केले आहे. हे निर्बंध 1 जुलै ते 10 ऑगस्ट 2025 दरम्यान लागू असतील. या कालावधीत ड्रोन, बलून आणि इतर कोणत्याही हवाई उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

केंद्रशासित प्रदेशाच्या गृहविभागाने हा आदेश जारी केला असून तो केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर देण्यात आला आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

सुरक्षा यंत्रणांना मिळाला अॅलर्ट

अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होऊन 8 ऑगस्टला समाप्त होणार आहे. हा धार्मिक उत्सव सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो. विशेषतः 22 एप्रिलला पहलगामच्या बैसरन भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या अॅलर्टनुसार हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरक्षा यंत्रणांनी ‘ऑपरेशन शिवा’ सुरू केले असून, पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवर यात्रा सुरक्षित पार पडण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. सुमारे 50 हजार अर्धसैनिक दलाचे जवान आणि जम्मू-कश्मीर पोलीस यांच्या सहकार्याने दररोज रोड ओपनिंग ऑपरेशन राबवले जाईल. यामध्ये स्फोटके व आयईडी शोधून निष्क्रिय केली जातील.

या वर्षी पहिल्यांदाच यात्रेच्या ताफ्यासाठी जॅमर यंत्रणांचा वापर केला जाणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी यात्रा मार्ग ताब्यात घेतले असून, संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

पारंपरिक सुरक्षा व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान, जॅमर्स आणि हवाई बंधने यामुळे हजारो भाविकांची यात्रा सुरक्षित करण्यास मदत होईल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

Amarnath Yatra 2025: No-Fly Zone Declared, Drone Ban from July 1 to August 10

Keywords: Amarnath Yatra 2025, No-fly zone Kashmir, Drone ban Amarnath route, Operation Shiva 2025, Amarnath Yatra security, Pahalgam Baltal route safety, Amarnath convoy jammer protection, Jammu Kashmir terror alert, Pilgrimage drone restriction, India Pakistan May 2025 conflict