
घरातील कामे करणारा आणि घरातील कामांची आठवण करून देणारा तसेच त्यावर देखरेख करणारा ‘अॅस्ट्रो’ रोबोट लाँच झाला आहे. अॅमेझॉनने खास घरासाठी हा स्मार्ट रोबोट आणला आहे. ‘ऍमेझॉन ऍस्ट्रो’ असे या रोबोटचे नाव आहे. रोबोटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी कॅमेरा आणि सेन्सर देण्यात आला आहे. या रोबाट एआय तंत्रज्ञानावर आधारित आहे. ‘अॅस्ट्रो’ला 17 इंचाच्या दोन क्रीन दिल्या असून त्या डोळ्यांचे काम करणार आहेत. त्याला चाके लावलेली असल्यामुळे हा घरात कुठेही जाऊ शकतो. त्याच्या मार्गात काही अडथळा आल्यास रोबोट स्वतःच रस्ता बदलू शकतो. तो मालकाने सांगितलेल्या आज्ञा पाळेल. रोबोटची किंमत अंदाजे 75 हजार रुपये एवढी आहे. लवकरच तो विक्रीसाठी उपलब्ध होईल.
































































