
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी सीईओ पद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या जागी अँडी जॉसी हे कंपनीचे नवे सीईओ असतील, मात्र जेफ बेजोस निवृत्त होणार नसून ते आता काही अन्य गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करणार आहेत.
जेफ बेजोस यांनी अॅमेझॉनचे सीईओ पद सोडल्याची घोषणा करतानाच हे स्पष्ट केले आहे की, ते अॅमेझॉनमधून बाहेर पडणार नाहीत. ते आता अॅमेझॉनचे एक्झीक्यूटिव बोर्डाचे एक्झीक्युटिव्ह चेअरमन म्हणून पद सांभाळणार आहेत.
जेफ बेजोस हे निवृत्त होणार नाहीत. तर हे एकप्रकारचे करिअर रीबूट असणार आहे. आता कंपनीद्वारे स्थापित करण्यात आलेल्या प्रोजेक्ट्सवर आपले होल्डिंग वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. बेजोस अशी पावलं उचलण्यासाठी तयार आहेत कारण त्यांच्याकडे प्रचंड कॅपिटल आहे.
बेजोस यांनी अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे कळवले आहे, ‘एग्जीक्यूटिव चेअरमेन म्हणून अॅमेझॉनच्या महत्त्वपूर्ण इनिशिएटिव्ससोबत ते जोडलेले राहणार आहेत. सोबतच डे वन फंड, बेजोस अर्थ फंड, ब्लू ओरिजिन, द वॉशिंगटन पोस्ट आणि दुसऱ्या पॅशनवर देखील आपला फोकस करणार आहेत. नव्या ऑर्गेनाइजेशन्सवर पडणाऱ्या इम्पॅक्टसाठी ते अधिक उत्साहित असल्याचे म्हणाले.’


























































