Amazon वरून मागवलेल्या 20 हजाराच्या हेडफोन ऐवजी बॉक्समध्ये निघाली टूथपेस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरबसल्या वस्तू मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन शॉपिंगला प्राध्यान्य दिले जात आहे. मात्र ऑनलाइन शॉपिंग दरम्यान अनेकदा फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये ग्राहकाला हेडफोन ऐवजी टूथपेस्ट मिळाली आहे.

एका ग्राहकाने अॅमेझॉनवरून 20 हजाराचे हेडफोन मागवले होते. पार्सल घरी आले तेव्हा बॉक्स सीलबंद होता. मात्र बॉक्स उघडल्यानंतर ग्राहकाला धक्का बसला. कारण बॉक्समध्ये हेडफोन ऐवजी टूथपेस्ट होती.

सदर ग्राहक मागवलेल्या प्रोडक्ट्सचे व्हिडीओ बनवून समाज माध्यमावर टाकत असे. यावेळी देखील ग्राहकाने आलेले पार्सल उघडत असताना त्याचा व्हिडीओ काढला होता. अनबॉक्सिंगचा हा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे.