आता अॅमेझॉनही स्वीकारणार दोन हजाराच्या नोटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amazon

19 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली असून 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमधून या नोटा बदलून घेण्यास किंवा खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. दरम्यान अॅमेझॉन या प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनीने ते ग्राहकांकडून दोन हजाराच्या नोटा स्वीकारणार असल्याचे जाहीर केले आहे.

अॅमेझॉनवरून जर तुम्ही एखादी गोष्ट कॅश ऑन डिलिव्हरी मोडवरून मागवली असेल तर तुम्ही ऑर्डर घेऊन येणाऱ्या व्यक्तीला दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये पेमेंट करू शकणार आहात. प्रत्येक महिन्यात अॅमेझॉन एका ग्राहकाकडून तब्बल 50 हजार रुपयापर्यंतच्या नोटा स्वीकारू शकणार आहेत. ”दुकानदार तुमच्याकडून दोन हजारांची नोट स्वीकारत नसतील तर अजिबात चिंता करू नका. आम्ही आहोत. आम्ही स्वीकारणार दोन हजाराच्या नोटा”, असे अॅमेझॉनने जाहीर केले आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत व्यवहारात राहणार आहेत. या नोटा बँक शाखांत परत करण्याची आणि तुमच्याजवळील नोटा बदलून घेण्यासाठी 23 मेपासून सुरुवात झाली आहे.