शपथविधी हेमंत सोरेन यांचा, पण चर्चा मात्र ‘या’ तरुण महिला आमदाराची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन हे राज्याचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. रविवारी हेमंत सोरेन राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. देशभरात या शपथविधीसोहळ्याची चर्चा असली तरी काँग्रेसच्या एका महिला आमदारानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी हजारीबाग जिल्ह्यातील बडकागाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर अंबा प्रसाद यांनी निवडणूक लढवली होती. 28 वर्षीय अंबा प्रसाद यांनी निवडणुकीमध्ये विजय मिळवत सर्वात कमी वयाची महिला आमदार होण्याचा विक्रम केला. अंबा प्रसाद यांनी आजसू पक्षाचे उमेदवार रोशनलाल चौधरी यांचा 30 हजार मतांनी पराभव केला.

amba-prasad1

अंबा प्रसाद यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. यानंतर त्यांनी बीबीए केले आणि राजकारणात प्रवेश केला. अंबा यांनी आपल्या आई-वडिलांकडून राजकीय वारसा घेतला आहे. अंबा प्रसाद यांचे वडील योगेंद्र साव आणि आई निर्माला देवी याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर आमदार राहिलेले आहेत. आता त्यांची मुलगी म्हणजे अंबा प्रसाद या देखील त्याच मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत.

amba-prasad2

दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये अंबा प्रसाद यांना शिक्षक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक मंत्रीपद मिळाल्यास चांगले काम करून दाखवेल असा विश्वासही अंबा प्रसाद यांनी व्यक्त करून दाखवला आहे. लोक मला योगेंद्र साव आणि निर्मला देवी यांची मुलगी म्हणून ओळखतात, मात्र या माझ्या मतदारसंघात मी चांगले काम करून नाव कमवून दाखवेल असेही अंबा प्रसार म्हणाल्या.