अंबडचे विस्तार अधिकारी राजेंद्र देशमुख यांना लाच घेताना रंगेहाथ अटक

503

जालना जिल्ह्यातील अंबड येथील पंचायत समिती कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र विठ्ठलराव देशमुख यांना तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच घेतांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 28 मे रोजी विस्तार अधिकारी देशमुख यांच्या चांगलेनगरातील राहत्या घरी पकडले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी तक्रारी दिली की, त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये विहीर खोदण्यासाठी दोन लाख 50 हजार रुपये मंजूर झाले असून दोन लाखाचे बिल काढण्यासाठी विस्तार अधिकारी राजेद्र देशमुख यांनी दहा हजार रुपये घेतले. तसेच उर्वरित राहिलेले 50 हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी विस्तार अधिकारी देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत विभागाने विस्तार अधिकारी यांच्या घरी सापळा लावून तक्रारदाराकडून विस्तार अधिकारी राजेंद्र देशमुख हे 5 हजारांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अनिता जमादार संभाजीनगर, उपअधिक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक एस.एस. शेख, कर्मचारी मनोहर खंडागळे, गणेश चेके, शिवाजी जमधडे, ज्ञानदेव जुंबड, अनिल सानप, सचिन राऊत, ज्ञानेश्वर म्हस्के व चालक प्रविण खंदारे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या