गद्दारांना गाडण्यासाठी जनता मतदानाच्या प्रतीक्षेत – अंबादास दानवे

गंगापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना आणि ठाकरे परिवार यांच्याशी निगडित आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा येथे काही गद्दारांनी मोडीत काढली. त्यामुळे त्यांना आता जागा दाखवावी लागेल. गद्दारांना गाडण्यासाठी जनता मतदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. त्यामुळे आता ही एकजूट कायम ठेवून विरोधी लोकांना गाडा, तरच नांदूर – मधमेश्वर कालव्याचे जनक आर.एम. वाणी यांना श्रद्धांजली ठरेल. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ वैजापूर येथे मेळावा पार पडला, त्यावेळी दानवे बोलत होते. आर.एम. वाणी यांचा विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केले.

वैजापूर मतदारसंघात अनेक गावागावांत खासदार निधींची कामे केली असून, पुरावे मागणारे तेव्हा कुठेही दिसत नव्हते. आर. एम. वाणी यांचे बोट धरून आलेले आता खोकेची मस्ती दाखवत आहे. त्यांना आता जनता रस्त्यावर आणेल, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वजित चव्हाण, मंजाहारी गाढे, काँग्रेसचे सुभाष तांबे, राहुल संत, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, संजय निकम, अंकुश सुंब, राजीव डोंगरे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांनी मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर लोकसभा समन्वयक प्रदीपकुमार खोपडे, सुदाम सोनवणे, सहसंपर्कप्रमुख अॅड. आसाराम रोठे, विजयराव साळवे, प्रमोद जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा लता पगारे, तालुका संघटक वर्षा जाधव, एकनाथ त्रिभुवन, उत्तमराव निकम, दिनकर पवार, संतोष जेजूरकर, राजू इंगळे, श्रीरंग आमटे पाटील, रमेश सावंत, रमेश पाटील, मुरलीनाना थोरात, राजेंद्र कराळे, सोमनाथ भराडे, अनिल नावले, राहुल साळुंके, किरण गणोरे, ऋषिकेश धाट, राहुल शिंदे, भरत आवारे, प्रकाश पाटील, संकेत वाणी आदींसह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत शिंदे, प्रास्ताविक तालुकाप्रमुख सचिन वाणी, आभार अक्षय साठे, ऋषिकेश राजपूत यांनी मानले.