Lok Sabha Election 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा व रोड शोंसाठी अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीची व स्वच्छतेची कामे करण्यात येत असून त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. हा एकप्रकारे चारसंहितेचा भंग असल्याचा आरोप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे. तसे प्रत्र त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना दिले आहे.
”हातकणंगले येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने विमानतळापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याची डागडूजी व स्वच्छेतीचीा कामे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहेत. निवडणूक व्यतिरिक्त काळात देशाचे पंतप्रधान किंवा इतर राजकीय महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळी अशी कामे करण्यात येत असतात. परंतु लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशात आदर्श आचारसंहिता सुरु असताना नरेंद्र मोदी यांच्या बैठकांच्या स्थळी जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शासकीय यंत्रणेचा वापर करुन कामे करण्यात येत आहेत. एक प्रकारे हा निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमांनुसार उचित कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी मुख्य निवडणुक आयुक्त यांच्याकडे केली आहे.