अंबरनाथच्या करोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू 

674

अंबरनाथमधील पहिल्या करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचारादरम्यान या 50 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली आहे.

अंबरनाथमधील हा ५० वर्षीय रुग्ण काही दिवसांपूर्वी खासगी कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेले होते. त्यानंतर त्यांना मधुमेह व हृदयविकार आदींचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी अंबरनाथमधील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे केलेल्या तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना मुंबईतील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

आपली प्रतिक्रिया द्या