
आंबोली येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आचाऱ्याने जेवण चांगले न बनवल्याने मालकीणीने झापले. त्यामुळे संतापलेल्या आचाऱ्याने मालकीणीला शॉक देऊन भिंतीवर आपटल्याची थरारक घटना घडली आहे. याप्रकरणी मालकिणीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आचाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील रॉयल क्लासिक इमारतीत 17 सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. हा आचारी गेली दोन वर्षे व्यावसायाने शिक्षिका असलेल्या महिलेकडे ( 45) आचारी म्हणून काम करत होता. रविवारी दुपारी मालकिणीचे आणि आचाऱ्याने जेवण नीट न बनवल्यावरुन वाद झाला. त्यानंतर महिलेने त्यांना निघून जाण्यास सांगितले. संतापलेल्या आचाऱ्याने महिलेलाच मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर तिचे भिंतीवर डोके आपटून घरातील उघड्या तारांचा शॉक देऊन तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करावे लागले जेथे तिच्यावर उपचार झाले आणि आता तिची प्रकृती स्थिर आहे.मात्र या घटनेने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. त्यांनी दावा केला आहे की, आचाऱ्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 308 अंतर्गत एफआयआर नोंदवल्याचे सांगितले. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपीची ओळख पटली असून पोलीस अधिक तपास करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी महिलेला आचाऱ्याबाबत विचारले असता त्या त्याच्या ती त्याच्या ठावठिकाणाबाबत प्राथमिक माहिती देऊ शकली नाही.
गुन्ह्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. आरोपीचा शोध सुरु असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.