
अमेरिकेत मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावला आहे. त्यामुळे सरकारने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. अमेरिकन हेल्थ अॅण्ड ह्युमन सर्व्हिसेस सेव्रेटरी जेवियर बेसेरा यांनी ही माहिती दिली. सध्या ही आणीबाणी 90 दिवसांसाठी लागू असेल. मंकीपॉक्सच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. आवश्यकता भासल्यास कठोर निर्बंध लादले जातील, असे बेसेरा यांनी सांगितले. देशात मंकीपॉक्सचे 7,102 रुग्ण आढळले असून त्यात 1,666 रुग्ण न्यूयॉर्कमधील आहेत.




























































