
रशियाच्या समुद्री हद्दीजवळ दोन पाणबुडय़ा तैनात करण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर रशिया खवळला आहे. दोन्ही देशांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त पाणबुडय़ा आहेत, येऊ द्या तुमच्या पाणबुडय़ा, असे आव्हानच रशियाने दिले आहे. ट्रम्प यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध थांबवण्याचा अल्टिमेटम रशियाला दिला आहे. त्या अल्टिमेटमची रशियाचे माजी अध्यक्ष मेदवेदेव यांनी खिल्ली उडवली होती. रशिया म्हणजे इस्रायल किंवा इराण नाही, असा इशारा मेदवेदेव यांनी दिला होता. त्यामुळे ट्रम्प भडकले. त्यांनी दोन पाणबुडय़ा रशियाच्या दिशेने पाठवण्याचे आदेश दिले. त्यावरून वाद सुरू आहे.