ओबामा यांच्या अमेरिकन फॅक्टरीला ऑस्करचे नामांकन

31900

92व्या ऑस्कर पुरस्कारातील नॉमिनेशन जारी झाले असून बेस्ट डॉक्युमेंटरी कॅटेगरीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबमा यांची निर्मिती असलेल्या ‘अमेरिकन फॅक्टरी’ला नामांकन मिळाले आहे. यामुळे सध्या आनंदी असलेल्या ओबामा यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. ओबामा यांनी ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला. हायर ग्राऊंड प्रॉडक्शन बराक ओबाम आणि मिशेल ओबामा यांची कंपनी असून या कंपनीने नेटफ्लिक्ससोबत पाटर्नरशिप केली आहे. अमेरिकन फॅक्टरी हायर ग्राऊंडची पहिलीच डॉक्युमेंटरी आहे. याचबरोबर टॉड फिलिप्स दिग्दर्शित जोकरला ऑस्करमध्ये सर्वाधिक नॉमिनेशन मिळाले आहेत. या चित्रपटाने उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळविले आहेत. ऑस्करचा पुरस्कार वितरण सोहळा 9 फेब्रुवारीला लॉस एंजेलीस येथे होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या