अमेरिकन ओपनमधला पराभव सिंधूच्या जिव्हारी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतला पराभव पीव्ही सिंधूच्या जिव्हारी लागला आहे. उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या गाओ फांगविरुद्ध सरळ गेममध्ये झालेला पराभव तिच्या पचनी पडलेला नाही. माझ्यासाठी या आव्हानात्मक वर्षात हा पराभव मानसिकदृष्टय़ा त्रासदायक आहे. प्रत्येक यशस्वी स्पर्धेनंतर निराशाजनक पराभवाचा अनुभव मनोधैर्याचे खच्चीकरण करणारा आहे. तरीही माझ्या भावनांना बळ देत माझे प्रयत्न दुप्पट करत आगामी स्पर्धांत जोरदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करीन, असा विश्वास सिंधूने व्यक्त केला आहे. सिंधूने फेब्रुवारीत दोहामध्ये झालेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत हिंदुस्थानला कांस्य पदक जिंकून दिले होते; मात्र त्यानंतर ती काही स्पर्धांना मुकली होती. सिंधूने आपल्याच देशाच्या लक्ष्य सेनच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. नाकाला झालेल्या शस्त्रक्रियेनंतरही त्याने कॅनडा ओपन जिंकल्याबद्दल त्याच्या झुंजार वृत्तीचे कौतुक करावे तितके कमीच आहे.