
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
हवाई दलात कार्यरत असताना एका वरिष्ठ अधिकार्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा गौप्यस्फोट अमेरिकन लोकप्रतिनिधी मार्था मॅकसॅली यांनी केला आहे. मार्था या अमेरिकेच्या पहिल्या फायटर वैमानिक आहेत. तसेच त्या सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या खासदारही आहेत. लैंगिक शोषणावरील एका सुनावणीदरम्यान त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
मार्था म्हणाल्या की, “माझ्यावर बलात्कार झाल्यानंतर मी लगेच याबाबत तक्रार नाही केली. कारण मी खूप घाबरले होते आणि मला काहीच कळत नव्हते. माझा व्यवस्थेवर विश्वासच नव्हता.” या घटनेसंदर्भातील इतर माहिती आणि आरोपीचे नाव मार्था यांनी सांगितले नाही.
या घटनेला आपण स्वतःच जबाबदार असल्याचे मार्था यांनी म्हटले. तसेस त्यावेळी वरिष्ठ अधिकार्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. हवाई दलात अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर मी या क्षेत्रातून बाहेर पडले. इतर पीडितेंसाराखी मी सुद्धा या व्यवस्थेला दोष देत होते. परंतु मी हार नाही मानली.”
52 वर्षीय मार्था यांनी वायुदलात 26 वर्षे नोकरी केली. 2010 साली निवृत्त होण्यापूर्वी मार्था कर्नलपदी पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्या अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीपदी निवडून आल्या.



























































