अभिनेत्री अमिषा पटेल यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल यांचे हॅकर्सने इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले होते. महाराष्ट्र सायबरने तपास करून अमिषा यांचे हॅक झालेले इंस्टाग्राम अकाउंट काही तासांतच रिकव्हर केले आहे. नुकतेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची घटना ताजी असतानाच अभिनेत्री अमिषा पटेल यांचे देखील इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले.

अमिषा या इंस्टाग्रामवर ऑक्टिव्ह असून त्या व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. सोमवारी अमिषा यांना इंस्टाग्रामवर एक मेसेज आला. कॉपी राईट्स कायद्याचे उल्लंघन केल्याने तुमचे अकाउंट 24 तासासाठी सस्पेंड केल्याचे त्यात नमूद होते. त्याना कॉपी राईट ऑब्जेक्शन फॉर्मची लिंक पाठवली. ती लिंक उघडताच अमिषा यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले.

अकाउंट हॅक झाल्याचे लक्षात येताच अमिषा यांनी महाराष्ट्र सायबरकडे धाव घेतली. महाराष्ट्र सायबरने तत्काळ तपास सुरू केला. महाराष्ट्र सायबरने इंस्टाग्रामच्या नोडल अधिकाऱयाना संपर्क साधून अमिषा यांचे अकाउंट रिकव्हर केले. या घटनेचा तपास करणाऱया अधिकाऱयांना 10 हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितले.