Amit Mishra Retirement – अश्विननंतर टीम इंडियाचा आणखी एक फिरकीपटू निवृत्त, सचिन तेंडुलकरहून जास्त काळ खेळलाय क्रिकेट

अमित मिश्रा - 160 विकेट्स

आर. अश्विन नंतर आणखी एका फिरकीपटूने निवृत्ती घेतली आहे. सचिन तेंडुलकरहून जास्त काळ क्रिकेट खेळणाऱ्या अमित मिश्रा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तब्बल २५ वर्ष तो क्रिकेटमध्ये सक्रिय होता, मात्र चार सप्टेंबर रोजी त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारला अलविदा केला.

अमित मिश्रा याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत क्रिकेटच आपले पहिले प्रेम, शिक्षक आणि आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू, कुटुंबीय आणि चाहत्यांचे विशेष आभार मानले.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अमित मिश्रा याने टीम इंडिया साठी २२ कसोटी, ३६ एकदिवसीय सामने आणि १० टी-२० सामने खेळले. २०१७ मध्ये त्यांने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र, त्याची आयपीएलमधील कामगिरी अविस्मरणीय ठरली. आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांसाठी हॅटट्रिक घेणारे एकमेव गोलंदाज आहेत. एकूण क्रिकेट कारकिर्दीत त्याच्या नावावर १०७२ विकेट्स घेतल्याची नोंद आहे.