आज खूश तो बहुत होंगे तुम!

686

बॉलिवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस. अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा दिवस. ‘आज खूश तो बहुत होंगे तुम’, अशीच त्यांच्या चाहत्यांची अवस्था असेल. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होईल. अमिताभही हात जोडून शुभेच्छांचा स्वीकार करताना दिसतील.

… तर तुम्हाला कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागणार नाही, जिओची मोठी घोषणा

‘कृतज्ञ हूं….मैं केवल एक विनयपूर्ण, विनम्र अमिताभ बच्चन हूं,’ असे काहीसं म्हणताना दिसतील. बावनकशी अभिनयासोबत बच्चन यांच्या याच विनम्रतेने रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलंय. त्यांनी दोन पिढय़ांना भरभरून दिलंय, रसिकांच्या आयुष्याचा मनोरंजनपट व्यापून टाकलाय.

पाच मराठी नेत्यांवर आले होते बायोपिक

वयाचा आकडा हा तुमच्या -माझ्यासारख्या सामान्य माणसाला कार्यापासून परावृत्त करू शकतो. पण ‘सदी का महानायक’ अशी उपाधी मिळालेला शहेनशहा त्याला अपवाद असतो. म्हणूनच सहस्त्रचंद्रदर्शनापासून अवघी तीन पावलं दूर असणारा हा अभिनय सम्राट आपल्याला अभिनयाने आजही थक्क करतोय. आपण अचंबित होण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही. त्यांच्या भावी वाटचालीला मन:पूर्वक शुभेच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या