… तर तुम्हाला कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागणार नाही, जिओची मोठी घोषणा

8903

दिवाळीच्या तोंडावर रिलायन्स जिओने ग्राहकांना बुधवारी मोठा दणका दिला. जिओ व्यतिरिक्त इतर नेटवर्कवर (एअरटेल, व्होडाफोन) कॉल करण्यासाठी आता जिओ ग्राहकांनाकडून पैसे वसूल करणार आहे. प्रत्येक मिनिटासाठी जिओ ग्राहकाकडून 6 पैसे वसूल करणार आहे. यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला होता.

आधी जिओसह इतर नेटवर्कवरही फुकटात कॉल करण्याची लाईफटाईम सुविधा जिओने दिली होती. परंतु नियमानुसार आता पैसे वसूल करणार आहे, असे जिओने स्पष्ट केले. यानंतर हा नवीन नियम कधीपासून लागू होणार याबाबत जिओचे ग्राहक संभ्रमावस्थेत होते. आता याबाबत जिओने अधिकृत पत्रकर काढत माहिती दिली आहे.

रिलायन्स जिओ सिमकार्डवर 9 ऑक्टोबरपूर्वी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना नवीन नियमानुसार पैसे द्यावे लागणार नाही. ते पूर्वीप्रमाणेच जिओव्यतिरिक्त इतर नेटवर्कवर फ्रीमध्ये कॉलिंगची सुविधा प्राप्त करणार आहेत. हा प्लान संपल्यानंतर मात्र त्यांना नवीन नियमानुसार पैसे द्यावे लागणार आहे. परंतु तोपर्यंत एकही पैसा कॉलिंगसाठी द्यावा लागणारन नाही, असे जिओने स्पष्ट केले आहे. याबाबत जिओने ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यामुळे सणावाराच्या दिवसात आपल्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना, चाहत्यांना, पाठीराख्यांना बिनधास्त फोन करू शकणार आहात.

पण एक वर्षाच्या प्लान घेतलेल्यांचे काय?
जिओ ग्राहकांचा सर्वाधिक आवडता प्लान 399 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. जिओच्या ट्वीटनुसार 9 ऑक्टोबरपूर्वी 399 रुपयांचा रिचार्ज करणाऱ्यांना प्लानची वैधता संपेपर्यंत फ्री कॉलिंगच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. परंतु यासह जिओचा एका वर्षाचाही एक लोकप्रिय प्लान आहे. या प्लान धारकांना एका वर्षासाठी पैसे द्यावे लागणार की नाही याबाबत स्पष्ट करण्य़ात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या