गुड न्यूज! महानायक अमिताभ यांची कोरोनावर मात

बॉलिवूड अभिनेते, महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली असून रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. अभिषेक बच्चन याने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी केलेल्या प्रार्थना, कामना करणाऱ्या चाहत्यांचे अभिषेक याने आभार मानले आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा 11 जुलैला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अभिषेक याच्यावर उपचार सुरू आहेत.

मृत्यूची कामना करणाऱ्या ट्रोलरवर महानायक अमिताभ भडकले, देवाच्या कृपेने जगलो-वाचलो तर…

ऐश्वर्या-आराध्या कोरोनामुक्त
12 जुलैला ऐश्वर्या-आराध्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर जया बच्चन यांची अहवाल निगेटिव्ह आला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यास दुजोरा दिला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 5 दिवसांनी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने ऐश्वर्या-आराध्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 10 दिवस उपचार घेतल्यानंतर आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या