एक-एक करून सगळे सोडून जाताहेत, सहकलाकाराच्या निधनानंतर बिग बी झाले भावुक

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि हास्य कलाकार जगदीप यांचे बुधवारी निधन झाले आणि गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जगदीप यांच्या निधनानंतर बिग बी अमिताभ बच्चन भावुक झाले असून त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. अमिताभ यांनी जगदीप यांच्यासोबतच्या अनेक आठवणी यावेळी ताज्या केल्या.

काल रात्री आपण आणखी एक हिरा गमावला. जगदीप यांनी कॉमेडीमध्ये आपली एक वेगळी शैली निर्माण केली होती. मला त्यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. चाहत्यांना ‘शोले’ आणि ‘शहंशाह’मध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष आवडल्या, असेही अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

screenshot_2020-07-08-23-13-31-566_com-twitter-android

जगदीप यांनी एका चित्रपटाची निर्मिती देखील केली होती आणि त्या चित्रपटात त्यांनी मला पाहुणा कलाकार म्हणून काम करण्याची संधी दिले. ते खूप शांत स्वभावाचे होते, असेही अमिताभ म्हणतात. तसेच एक-एक करून आपले सहकारी सोडून जात असल्याचे दुःख त्यांनी बोलून दाखवले.

आपली प्रतिक्रिया द्या