नितेश तिवारींच्या ‘रामायण’ सिनेमात अमिताभ बच्चन साकारणार दशरत राजाची भूमिका?

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन लवकरच एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी आगामी ‘रामायण’ सिनेमाची तयारी जोरात सुरू केली आहे. या सिनेमात मोठी कास्ट पाहायला मिळणार आहे. दिवसेंदिवस या सिनेमातील नवीन कलाकारांची नावे समोर येत आहेत.या बातम्यांचे सत्य अद्याप समोर आलेले नाही. मात्र ‘रामायण’मध्ये राजा दशरथाची भूमिका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन साकारणार आहेत.

या सिनेमाबाबत बोलायचे झाले तर तो मोठ्या प्रमाणावर बनवण्याची तयारी सुरू आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक नितीश तिवारी करत आहेत. सिनेमाचे बजेट जवळपास 500 ते 700 कोटी रुपये आहे. गेल्या चार वर्षांपासून ते या सिनेमावर काम करत आहे. आता हळूहळू त्यावर अपडेट्स येऊ लागले आहेत. मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. सिनेमातील रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

या सिनेमात हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलला विचारण्यात आले आहे. याशिवाय या सिनेमात रावणाच्या भूमिकेसाठी यशला कास्ट करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय लक्ष्मणच्या भूमिकेसाठी नवीन पॉलिशेट्टी, कुंभकरणच्या भूमिकेसाठी बॉबी देओल, विभीषणच्या भूमिकेसाठी विजय सेतुपती यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे वृत्त आहे. पण कलाकारांबद्दल पुष्टी अद्याप येणे बाकी आहे.