अमिताभ बच्चन यांच्या चाहत्याचा ‘कारनामा’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. नुकताच आपल्या एका चाहत्याने केलेला ‘कार’नामा पाहून ‘बिग बी’ आश्चर्यचकित झाले. या चाहत्याने चक्क आपल्या गाडीवर ‘बिग बी’ यांचे फोटो आणि त्यांच्या चित्रपटांमधील लोकप्रिय संवाद रंगवले आहेत.

नुकतीच या चाहत्याने ‘बिग बी’ यांची केबीसीच्या सेटवर भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘बिग बी’ यांनी म्हटलंय, ‘‘या चाहत्याने माझ्या चित्रपटांमधील संवाद संपूर्ण कारवर लिहीले आहेत. ही कार उघडताच साऊंड सिस्टीममधून माझ्या चित्रपटांमधील संवाद ऐकायला मिळतात. हे खूप आश्चर्यकारक आहे. त्याने नुकतीच ही कार खरेदी केली आहे. मी जोपर्यंत डॅशबोर्डवर ऑटोग्राफ देत नाही, तोपर्यंत ही कार चालवणार नाही असे त्याने ठरवले होते. अखेर मी त्याला ऑटोग्राफ दिला.’’ विशेष म्हणजे या चाहत्याच्या टी-शर्टवरदेखील ‘बिग बी’ यांच्या चित्रपटांची नावे दिसत आहे. ‘बिग बी’ यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.