अमिताभ कांत यांचा जी-20 शेरपापदाचा राजीनामा

नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी सोमवारी जी-20 शेरपापदाचा राजीनामा दिला. 45 वर्षांच्या सार्वजनिक सेवेतून निवृत्त होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला अनेक विकास कामे करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असे अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. अमिताभ कांत यांना 2022 मध्ये जी-20 शेरपा म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हिंदुस्थानला मिळालेल्या जी-20 चे अध्यक्षपदाचे नेतृत्व करणे हे माझ्या करिअरमध्ये मला मिळालेले सर्वोत्कृष्ट काम होते, असे अमिताभ म्हणाले.