अ‍ॅक्सिसच्या अमिताभ चौधरी आणि डॉक्टर राजीव अग्रवाल यांना मानद डॉक्टरेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ॲमिटी विद्यापीठ मुंबईचा दुसरा दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला. यावेळी साडे तीन हजार विद्यार्थ्यांसहित मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. एक्सिस बँकेचे एमडी अमिताभ चौधरी, कँसरतज्ज्ञ डॉक्टर राजीव अग्रवाल, प्रसिध्द वकिल निशिथ देसाई आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संस्थापक डीन रॉबर्ट सस्किंड यांना मानद पदवी देण्यात आली. विद्यापीठाचे कुलपती डॉ.असीम चौहान आणि प्र-कुलगुरु डॉ.ए.डब्ल्यू संतोष कुमार यांच्या हस्ते हा पदवीदान कार्यक्रम पार पडला.

गेल्या काही दिवसांत अ‍ॅक्सिस बँकेनं चांगली कामगिरी केली असून त्याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारातील कामगिरीतून दिसून आले आहेत. याशिवाय नुकत्याच झालेल्या सिटी बँकेसोबतच्या व्यवहारासाठी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अमिताभ चौधरी यांचा डी.फील पदवी देण्यात आली. स्तनाचा कर्करोग आणि त्यावरच्या अद्ययावत शस्त्रक्रियेसाठी डॉ. राजीव अग्रवाल यांना डी.एससी आणि न्यायप्रक्रियेत आमुलाग्र बदल सुचवणाऱ्या केसेस लढणारे वकिल निशिथ देसाई यांना एलएल.डी ही मानद पदवी देण्यात आली.

विद्यापीठातर्फे सुमारे साडे तीन हजार विद्यार्थ्यांच्या पदवीदानाचा कार्यक्रम बहाल करण्यात आला. यात 80 सुवर्ण पदकं आणि 9 पीएचडी पदवी देण्यात आल्या. ॲमेटी विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं खासगी विद्यापीठ आहे.