अमृतसर स्फोटात पाकिस्तानचा हात, तिसर्‍या आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमृतसर

अमृतसरमध्ये निरंकारी मिशनमध्ये झालेल्या स्फोटात आयएसआयचा हात होता अशी माहिती मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी दिली. तसेच या स्फोटातील तिसर्‍या आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचे नाव बिक्रमसिंग असून एका आरोपीची ओळख पटली आहे, त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल असे सिंग यानी सांगितले.

झालेल्या स्फोटात कुठल्याही धर्माचा एँगल नसून ही दहशतवाधी घटना असल्याचे सिंग यांनी म्हटले. तसेच अटक केलेल्या आरोपींकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत व यामागे पाकिस्तान आणि आयएसआयचा हात आहे. जे ग्रेनेड हल्ल्याच्या ठिकाणी वापरले गेले त्यावर पाकिस्तानच्या एका कारखान्याचा शिक्का होता. अशा प्रकारचे ग्रेनेड दहशतवादी कश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्याविरोधात वापरले जातात असेही त्यांनी यावेळी नमूद केले.