
अमूलचे दूध उद्या गुरुवार 1 जुलै पासून दोन रुपयांनी महागणार आहे. दूध पॅकिंग खर्चाबरोबरच, वाहतूक खर्च वाढल्याने अमूलने प्रति लिटर दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. दूध पॅकिंगच्या खर्चात जवळपास 30-40 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमूलचे गाईचे दूध सध्या 48 रुपये लिटर दराने मिळत असून ते 50 रुपये तर 56 रुपये किंमत असलेले अमूल गोल्ड दूध 58 रुपयांना मिळणार आहे.

























































