‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नेंट, बॉयफ्रेंडसोबत शेअर केला फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

रोबोट, 2.o, सिंग इज ब्लिंग अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन ही लग्नाआधीच गरोदर राहिली आहे. अॅमीने तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानायीओतो याच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोत तिचा बेबी बम्पही दिसत आहे.

अॅमी आणि जॉर्ज हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जानेवारी महिन्यांत त्यांनी साखरपुडाही केल्याचे जाहीर केले होते. जॉर्ज हा लंडनमधील प्रसिद्ध बिल्डर अंद्रेस पानायीओतो यांचा मुलगा आहे. तसेच त्याने स्वत:ची द अॅबिलीटी ग्रुप नावाची कंपनी देखील सुरू केली आहे. कंपनी अंतर्गत त्याची अनेक पंचतारांकीत हॉटेल्स आहेत.