शार्क टँकने नाकारले तरीही झाला मोठा उद्योजक

उद्योजक जेमी सिमिनॉफ यांचा एक प्रेरणादायी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अवघ्या पाच दिवसांत या व्हिडीओला 14 मिलियन व्हूज मिळाले आहेत. जेमी सिमिनॉफ हे 2013 साली नव उद्योजकांच्या विविध कल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱया शार्क टँक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यात त्यांनी परीक्षकांसमोर वायफाय व्हिडीओ डोअरबेलची संकल्पना मांडली. परीक्षकांना त्यात काही फारसा रस वाटला नाही. तरीही न खचता त्याने आपले प्रयत्न सुरू ठेवले. जेमीने रिंग नावाने आपल्या ब्रॅण्डला रिलाँच केले. अवघ्या पाच वर्षांत अमेझॉनने त्याची कंपनी 1 बिलियन डॉलरला विकत घेतली.