अभिमानाने सांगतो महाराष्ट्रात सर्वाधिक बारव आहेत, अभ्यासक रोहन काळे

गडकिल्ले, लेण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसाने वैभवसंपन्न असलेल्या महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणजे ‘बारव’. बारवला इंग्रजीत ‘स्टेपवेल’ (Stepwell) असं म्हटलं जातं. मुंबईतील रोहन काळे यांनी ‘बारव’ची ओळख जपण्यासाठी त्याचा अभ्यास करून ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ सुरू केली आहे. यामुळे आता महाराष्ट्रात ‘बारव’ जपण्यासाठी पुढाकार घेतला जात असून पाणीसाठा करण्यासाठीची पुरातन आणि वैशिष्ट्य पूर्णपद्धत जगासमोर आली आहे.

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात 20 हजार हून अधिक बारव असण्याची शक्यता आहे. यापैकी जवळपास 400 बारव रोहन काळे यांनी तब्बल 14 हजार किलोमीटरचा प्रवास करून पाहिल्या आणि त्यांचा अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं डेटा गोळा केला आहे. तर अन्य हजाराहून अधिक बारवांच मॅपिंग त्याने स्थानिक अभ्यासकांच्या मदतीनं केलं आहे. या मोहिमेसाठी त्यांनी अनेक व्यक्ती आणि संस्थांना जोडलं आहे. तसंच राज्याच्या पुरातत्त्व विभाग आणि नगर विकास विभागाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाचीही साथ आता त्यांना लाभत आहे. रोहन काळे यांनी महाराष्ट्रातील ‘बारव’ प्रकाश झोतात आणून राज्याला नवी ओळख दिली आणि इथल्या वैभवशाली इतिहासाची जाणीव करून दिली. लोकांना ‘बारव’ मोहीमेसाठी ते प्रेरितही करत आहे.

नाशिकमधील चांदशी येथील विद्यावर्धन महाविद्यालयात 25 आणि 26 मार्च रोजी याचं ‘स्टेपवेल अ लॉस्ट स्टोरी’ (Stepwell a Lost Story) हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यानिमित्तानं रोहन काळे (Rohan Kale) यांच्याशी विशाल अहिरराव (Vishal Ahirrao) यांनी केलेली बातचीत.