गगनचुंबी इमारतीची विश्रांती…

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. नुकताच त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर थल्लासेरी – माहे बायपासचा एक फोटो शेअर करत म्हटलंय, एखादी गगनचुंबी इमारत किनाऱयावर शांतपणे विश्रांती घेत असल्यासारखे दिसतेय. सुरुवातीला मला नैसर्गिक जागेवर काँक्रिटचा पट्टा जाणवला. पण त्याचेही एक वेगळे सौंदर्य आहे. या बायपासवरून प्रवास करुन येथील सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे. गेल्याच महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते 18.6 किमीच्या या सहा पदरी बायपासचे लोकार्पण झाले होते.