कमी जागेतही पार्क करता येते कार; कशी? पाहा व्हिडीओ…

1308

शहरी भागात गाड्यांची पार्किंग ही एक मोठी समस्या आहे. यामुळे अनेक जण चारचाकी गाडी खरेदी करताना विचार करतात. मात्र आता चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण आता कमी जागेतही तुम्हाला गाडी पार्क करता येणार आहे. यासंबंधितच एक व्हिडीओ महिंद्र अँड महिंद्र उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्र यांनी शेअर केला आहे.

हा व्हिडीओ @ragarwal नामक एका ट्विटर वापरकर्त्याने शेअर केला आहे. ज्याला आनंद महिंद्रा यांनी रीट्वीट केला आहे. या व्हिडीओत कमी जागेत गाडी कशी पार्क केली जाऊ शकते यासाठीचा एक देशी जुगाड दाखवला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हटले आहे की, ‘अडचणींवर मात करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधणे ही हिंदुस्थानींची कला आहे.’ या व्हिडीओत एक व्यक्ती कार आणून लोखंडी स्टॅन्डवर ठेवतो. नंतर त्याला सहज कोपऱ्यात सरकावतो. ज्यामुळे कमी जागेत कार आरामात फिट होते. आता पार्किंगसाठी तुम्हीही हा देशी जुगाड करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या