Photo – गोल्डन रंगाच्या लेहेंग्यामध्ये अनन्या पांड्येचे ग्लॅमरस लूक, चाहते झाले घायाळ

अभिनेत्री अनन्या पाण्ड़े तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या स्टायलिश अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. सध्या ती चर्चेत असून तिचा ‘ड्रीम गर्ल 2’ चे यश साजरे करत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचे कलेक्शन केले आहे. दरम्यान अनन्याने आपल्या सोशल मीडीयावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्याने सोनेरी रंगाचा लेहेंगा असून त्यात ती फार ग्लॅमरस दिसत आहे. या लेहेंग्यावर जरीचे काम केलेले असून तिने त्यावर दुपट्टाही सारख्या रंगाचा घेतला आहे. तर अनन्याने लेहेंग्यावर घातलेला ब्लाऊजने तिच्या सौदर्यात भर घातली असून त्यात ती सुपर हॉट दिसत आहे. अनन्याने कपाळावर टिकली, गळ्यात नेकलेस आणि कानात लहान कानातले घातले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते तिच्या सौंदर्यांने घायाळ झाले आहेत.