
साहित्य : 2 वाटय़ा कणिक, 4 चमचे मोहनासाठी पातळ डालडा, चवीनुसार मीठ.
आतील सारण : 3-4 अंडी, 1 कांदा, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ
कृती ः सर्वप्रथम अंडी फोडून घ्यावीत. त्यानंतर थोडय़ाशा तुपावर कांदा परतून घ्यावा. त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून चमच्याने ढवळावे. अंडय़ाचे हे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की, उतरवावे. कोथिंबीर घालावी आणि थंड होऊ द्यावे. नंतर कणकेत मीठ व डालडय़ाचे मोहन घालून घट्ट कणिक भिजवावी. अर्धा तास ही मळलेली कणिक झाकून ठेवावी. त्यानंतर त्याच्या दोन पुऱया लाटून घ्याव्यात. त्यातील एका पुरीवर अंडय़ाचे मिश्रण थोडे पसरून त्यावर दुसरी पुरी ठेवावी. दोन्ही पुऱयांच्या कडा जुळवून घ्याव्या आणि थोडेसे लाटावे. नंतर तव्यावर दोन्हीकडून तूप सोडून हा लाटलेला पराठा खरपूस खमंग शेकून घ्यावा.





























































