
अंधंरीतील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांचे राजकारणातील योगदान विचारात घेण्याची गरज आहे. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या आहेत. या पदासाठी मिळणारा कालवधी लक्षात घेत, कोणताही प्रतिष्ठेचा प्रश्न न करता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन आपण करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आपल्याला जे योग्य वाटले, ते आवाहन आपण केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या जागेवरून जी व्यक्ती निवडून येईल, त्यांना दीड वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे दीड वर्षाच्या कार्याकाळासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांचे राजकारणातील योगदान आणि त्यांच्या पत्नीच या जागवेरून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करून राज्यात चांगला संदेश द्यावा, असेही त्यांनी आवाहन करताना म्हटले आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत अजून आहे, त्यामुळे आपण हे आवाहन करत आहोत. राष्ट्रवादीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आपल्याला वाटते, म्हणून हे आवाहन केल्याचे पवार यांनी सांगितले.


































































