
पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अभिषेक बारोट, विपुल पटेलसह महिलेला अंधेरी पोलिसांनी अटक केली. तक्रारदाराला मारण्यासाठी विपुलने अभिषेकला दोन लाखांची सुपारी दिली होती.
तक्रारदारावर गेल्या आठवडय़ात अंधेरी येथे मोटारसायकलवरून आलेल्या एकाने चाकू हल्ला केला होता. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संताजी घोरपडे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दिगंबर पगार, सहाय्यक निरीक्षक क्षीरसागर यांनी केलेल्या तपासात गुन्हय़ात वापरलेली मोटारसायकल कांदिवली येथील असल्याचे समजताच तेथून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असता अभिषेकचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला सुरत येथून अटक केली. व्यावसायिकावर हल्ला केल्यानंतर अभिषेकने कांदिवली येथे जात एका मित्राला संपर्क केला. दोन दिवसांत मुंबईत पुन्हा येऊन गाडी घेऊन जातो असे सांगून अभिषेक हा गाडी ठेवून निघून गेला. अभिषेकच्या चौकशीत विपुलचे नाव समोर आले. विपुलला अटक केल्यावर महिलेचे नाव समोर आले. तिलादेखील पोलिसांनी अटक केली.




























































