
आंध्र प्रदेशमधील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. मरेडुमिल्ली घाटातून जात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात झाला.






























































