
सामना ऑनलाईन । अमरावती
आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याचे ठरवले आहे. हे पाच उपमुख्यमंत्री प्रत्येकी एससी, एसटी, बीसी, अल्पसंख्याक आणि कापू समाजातून असणार आहेत. शुक्रवारी वायआरएस काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली असून त्यात त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे पाच उपमुख्यमंत्री नेमण्यात येणार आहेत.
YSRCP MLA MM Shaik: We are very happy, there will be 5 Deputy Chief Ministers in Andhra Pradesh. The Deputy CMs will be one each from Scheduled Caste, Scheduled Tribe, Backward Castes, Minority and Kapu community. He (Jaganmohan Reddy) will prove to be the best CM in India ever. pic.twitter.com/PH2teDBYoT
— ANI (@ANI) June 7, 2019
वायएसआर काँग्रेसच्या ताडेपल्ले येथील कार्यालयात आज मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आमदारांची एक बैठक पार पडली. यावेळी 25 कॅबिनेट मंत्र्यांचा शनिवारी शपथविधी होईल हे जाहीर करण्यात आले. तसेच अडीच वर्षांनी कॅबिनेटमधील मंत्रिपदे बदलण्यात येतील असेही यावेळी रेड्डी यांनी सांगितले.
‘मी तुमच्या कामांकडे बारकाईने लक्ष देणार आहे. त्यामुळे मंत्र्यांनी आमदरांनी त्यांची कामे चोख बजावावीत. जनतेच्या समस्या हाताळताना त्यांनी काळजीपूर्वक हाताळाव्यात. याआधीच्या सरकारमध्ये व आपल्या सरकारमध्ये फरक आहे हे लोकांना आपण दाखवलं पाहिजे’, असे जगनमोहन रेड्डीने या बैठकीत सांगितले.
























































