शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर नगर जिल्हा अंगणवाडी सेविका-मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, वेतनवाढ, दरमहा पेन्शन आदींसह विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने धडक मोर्चा काढून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. मोर्चा नगरपरिषदेपासून घोषणा देत पिपळवाडी रस्त्यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांनी मोर्चाच्या वतीने निवेदन स्वीकारले.
निवेदनात ग्रॅज्युटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा मिळावी,अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून योगदान न घेता दरमहा पेन्शन द्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात आले. यावेळी नगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनिस कर्मचारी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके ,अध्यक्ष कॉ. मदिना शेख, सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे,उपाध्यक्ष कॉ.शरद संसारे यांची भाषणे झालीत,यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचारी सोमवार दि 4 डिसेंबर पासून संपावर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने करीत आहेत, याकडे शासनाचे लक्ष येत्या हिवाळी अधिवेशनात नागपुर येथे अंगणवाडी कृति समितीच्या वतीने दि.15 डिसेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चा ही काढण्यात येणार आहे.शासनाने तातडीने सर्व प्रसन्न सोडविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके ,अध्यक्ष कॉ. मदिना शेख, सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे,कॉ.शरद संसारे,मीना कुटे, रागिणी जाधव,वंदना गमे,सारिका गायकवाड,नंदा नरोडे,मनिषा जाधव,सरला राहणे,मंदा वाबळे, शकीला पठाण, ज्योती डहाळे,सपना जाधव, लीलाताई सोनवणे, सीमा आरगले,पौर्णिमा खरे,ज्योती जपे, मांगदले पारधें,सुरेखा पाळदे,सविता लहारे,वैशाली धिवर, आदींसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होत्या.