अनिल अंबानी यांच्यावर दिवाळखोरीची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोडोंची संपत्ती असलेल्या अनिल अंबानी यांच्यावर दिवाळखोरीची कारवाई होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेण्यात आलेले 1 हजार 200 कोटींचे कर्ज फेडता न आल्याने त्यांच्यावर दिवाळखोरीची कारवाई करण्याची परवानगी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने दिली आहे. एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक असलेले अनिल अंबानी यांच्यावर दिवाळखोरीची कारवाई होणार असल्याने उद्योग जगत हादरले आहे.

अनिल अंबानी यांनी स्टेट बँक आफ इंडियाकडून रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स इप्राटेल या कंपन्यांसाठी कर्ज घेतले. 2016 साली घेतलेल्या कर्जासाठी त्यांनी 1 हजार 200 कोटींची रुपयांची वैयक्तिक हमी दिली होती. मात्र दोन्ही कंपन्या बंद झाल्या आणि एसबीआयने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे अपील केले. बँकेने अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे मुंबईतील कार्यालय, रिलायन्स सेंटर, 21 हजार वर्ग फुटांहून अधिक जागा आणि मुंबईतील दोन इमारतींचा ताबा घेतला होता.