ऑफीस भाड्याने देणे आहे! अनिल अंबानींच्या RInfra मुख्यालयाचा शाळेला प्रस्ताव

Anil Ambani अनिल अंबानी यांच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी लंडनमधील एका न्यायालयाला ते दिवाळखोर झाल्याची माहिती दिली होती. कर्जदारांची देणी कशी चुकवायची या विवंचनेत असलेल्या अनिल अंबानी यांच्या Reliance ADAG म्हणजेच अनिल धीरुभाई अंबानी समूहातील RInfra कंपनीचे मुख्यालय भाड्याने देण्याबाबत विचार सुरू करण्यात आला आहे. याबाबत अमेरिकेतील एका शाळेशी बोलणी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Reliance अनिल अंबानींची वाट का लागली ?

मुंबईतील सांताक्रूझ भागात असलेले हे मुख्यालय भाड्याने देण्याबाबत व्हिटल स्कूल्स अँड स्टुडिओजशी बोलणी सुरू झाल्याचे कळते आहे. या शाळेचे मुख्यालय वॉशिंग्टन इथे आहे.

अनिल अंबानींवरील ‘रिलायन्स’ उठला, 15 हजार कोटींच्या कर्ज परतफेडीसाठी चीनचा तगादा

अनिल अंबानी यांच्या RCom रिलायन्स कम्युनिकेशन्सविरूद्ध चीनमधल्या काही कंपन्यांनी लंडनमधल्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. 5 हजार कोटींचे कर्ज घेऊन ते न चुकवल्याचा अनिल अंबानी यांच्या कंपनीवर आरोप आहे. या खटल्यादरम्यान अनिल अंबानी यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं होतं की त्यांच्याकडे आता काहीच संपत्ती उरलेली नाहीये आणि ते कंगाल झाले आहेत.

व्यापाराला मंदीचा फटका; खर्चाला लगाम, अनिल अंबानी आलिशान विमान देणार भाडय़ाने

रिलायन्स इन्फ्राचे मुख्यालय हे पश्चिम द्रुतगती मार्गाला लागून आहे. 3.83 एकर क्षेत्रावर वसलेलं हे कार्यालय अत्यंत मोक्याच्या जागी आहे. या कार्यालयाच्या जागेत 425 गाडय़ा पार्क करता येतील इतकी जागा आहे. रिलायन्स सेंटरमधील कर्मचाऱयांनाही कंपनीच्या विविध कार्यालयांमध्ये हलवण्यात येणार आहे. ही जागा भाड्याने देण्यासाठी जागांबाबतचे व्यवहार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीला नेमण्यात आले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असल्याने आणि विमानतळ जवळ असल्याने ही जागा भाड्याने दिल्यास या जागेसाठी प्रत्येकी चौरस फुटाला 240 ते 250 रुपये अधिक देखभालीचा खर्च इतका भाव मिळू शकतो असं मुंबई मिरर या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

रिलायन्स इन्फ्राने 2003 साली वीज वितरण कंपनीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी BSES या कंपनीवर ताबा मिळवला होता. या सौद्यामध्ये त्यांना ही जागाही मिळाली होती. गेल्या वर्षी वीज वितरण व्यवसाय अनिल अंबानींच्या कंपनीने अदानी यांच्या कंपनीला विकला होता. मात्र या सौद्यामध्ये त्यांनी ही जागा विकली नव्हती. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर 1 लाख कोटींपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. यात रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रा, आरकॉम आणि रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स पॉवर या कंपन्या कर्जात आकंठ बुडाल्या आहेत. यातील आरकॉमवर सर्वाधिक कर्ज असून त्याचा आकडा 47 हजार 234 कोटींपर्यंत पोहचला आहे.

व्हिटल स्कूलच्या प्रवक्त्याने मुंबईसह हिंदुस्थानमधील प्रमुख शहरांमध्ये शाळेसाठी जागा शोधत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि चीनमधल्या शेनझेन मधल्या संकुलाचा इतर देशांत विस्तार करण्याची त्यांची योजना असून त्यासाठी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये जागांचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र अनिल अंबानी यांनी कंपनीसोबत बोलणी सुरू असल्याच्या वृत्ताबाबत विचारलं असता शाळेच्या प्रवक्त्याने सध्या या विषयावर भाष्य करणार नाही असं सांगितलं आहे. बोलणी पूर्ण झाल्यानंतर आणि विद्यार्थ्यांचे दाखल सुरू झाल्यानंतरच या विषयावर बोलू असं त्यांनी सांगितलं आहे.

एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात अग्रगण्य कंपनी असलेल्या आरकॉमचे मालक अनिल अंबानी यांची कंपनी कंगाल झाली आहे. या कंपनीची संपत्ती 18 हजार कोटी आहे, मात्र डोक्यावर बोजा हा 50 हजार कोटींचा आहे. 2008 साली अनिलं अंबानी यांचे नाव फोर्ब्जने जाहीर केलेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर होते. मात्र अनेक कारणांमुळे अनिल अंबानी यांचे दिवस फिरले आणि आता त्यांच्या कंपनी दिवाळखोर झाली आहे.

11 वर्षांत कंपनीची संपत्ती प्रचंड घटली
गेल्या 11 वर्षांत रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संपत्तीत प्रचंड घट झाली आहे. ही कंपनी सध्या दिवाळखोरी कायद्याच्या प्रक्रियेतून जात आहे. 2008 मध्ये कंपनीकडे 42 अब्ज डॉलर इतकी संपत्ती होती. 2019 पर्यंत संपत्तीत घट होऊन ती 5230 दशलक्ष डॉलर म्हणजेच 3651 कोटी रुपये इतकी झाली.

कंपनीला 30 हजार कोटींचे नुकसान
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला तब्बल 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. व्होडाफोन-आयडियाला झालेल्या नुकसानीनंतरचे हे दुसरे सर्वात मोठे नुकसान आहे. हे नुकसान कंपनीने जाहीर केल्यानंतर आरकॉमचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यासह छाया विरानी, रायना करानी, मंजरी काकेर आणि सुरेश रंगाचर या चार संचालकांनीही राजीनामा दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या