अनिल अंबानींनी दोन कंपन्यांचा दिला राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांनी रिलायन्स पॉकर आणि रिलायन्स इप्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. सेबीने त्यांना कोणत्याही सूचीबद्ध कंपनीपासून दूर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार अनिल यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. दरम्यान रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इफ्राच्या संचालक मंडळाने तत्काळ राहुल सरीन यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली, असे दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या नियुक्तीकर सर्वसाधारण सभेत सदस्यांची मंजुरी घेणे बाकी आहे. दरम्यान अंबानींच्या राजिनाम्याबाबत सेबीलाही कळवले आहे.