वेळ न दवडता सभापतींनी निर्णय घ्यायला हवा – अनिल देसाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदारांच्या अपात्र प्रकरणावर आज विधानभवनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 13 ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी शिवसेनेचे वकील देवदत्त कामत, आमदार अॅड. अनिल परब, सुनिल प्रभू आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. सुनावणीनंतर खासदार अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांसमोर माहिती दिली.

”21 जूनला आम्ही मिटिंग बोलावली होती. त्यावेळी शिंदे गटाचे काही आमदार अनुपस्थित राहिले होते. त्यांनी त्याबाबत काही सांगितलं नाही. त्यांनी कुणाला त्याबाबत काही कारण सांगितले का हे देखील माहित नाही. ही बाब त्यांनीही नाकारलेली नाही. त्यामुळे ते आले नव्हते हे स्पष्ट होतंय. पक्षाच्या बैठकीला बोलावलेले असताना आमदारांनी न येणं हे 10व्या सूचीच्या परिशिष्ट 10 अमध्ये येतं. त्यानुसारच सभापतींनी त्यांचं हे कृत्य अपात्रतेच्या कायद्यात बसतं की नाही हे ठरवायचं आहे. पुढे ते सुरत गुवाहटीला गेले. तिथे त्यांनी काही ठराव करेला. आम्ही पण त्या गोष्टी नाकारत नाही. त्यांनी असं करणं देखील नियमामुसार उल्लंघनच आहे. आम्ही म्हणजे उद्धव ठाकरे

त्यांनी त्या केल्या हे नियमांचं उल्लंघन आहे. उद्धव ठाकरे हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. तरीही त्यांनी ठराव पास केला. सभागृहात त्यांना सुनील प्रभूंचा व्हिप मानायचा होता. तिथेही त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे अपात्रतेची कारवाई करण्यासाठी अध्यक्षांना पुरावे गोळा करण्याची गरजच नाही. आम्ही हे मुद्दे सतत अध्यक्षांना लक्षात आणून देत आहोत. 29 आणि 30 जून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले. 30 जूनला त्यांचा शपथविधी झाला. या सगळ्या गोष्टींना पुराव्याची गरज नाही कारण ते सगळं झालंच आहे. त्यामुळे अपात्रतेची कारवाई 2/1 अ आणि ब नुसार हे उल्लंघनच आहे. हे सगळे मुद्दे आम्ही अध्यक्षांना दिले आहेत. आता पुढची वेळ न दवडता तुम्ही निर्णय घ्या अशी विनंती आम्ही अध्यक्षांना केली आहे असं अनिल देसाई यांनी सांगितलं.