
राज्यातील मंत्र्यांचे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की होत आहे. जनसुरक्षा विधेयक मंजूर करताना सरकारने मोठी भाषणे करण्यात आली, पण जनतेची सुरक्षा बाजूला ठेवा, आधी मंत्र्यांना सुरक्षा द्या, महाराष्ट्रातले मंत्रीच सुरक्षित नाहीत आणि इथे जनसुरक्षा विधेयक आणले जात आहे. आधी मंत्र्यांना सुरक्षा द्या आणि नंतर जनतेला सुरक्षा द्या, असा सणसणीत टोला शिवसेना आमदार अनिल परब यांनी मारला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जावी, अशी मागणीही परब यांनी केली.
अशांना दोन दोन कपडे तरी द्या!
मंत्री उघडे-नागडे फिरत आहेत. त्यामुळे अशा मंत्र्यांना सरकारकडून दोन दोन कपडे तरी द्या. मंत्री उघडे-नागडे फिरत आहेत. काय चालले आहे हे? बेडरूममधला व्हिडीओ बाहेर आलाच कसा, असा टोलाही परब यांनी लगावला.
शिवसेना आमदार अनिल परब यांनी 289 अन्वये शिंदे गटाच्या एका मंत्र्याच्या व्हिडीओचा संदर्भ घेऊन सरकार, कायदा-सुव्यवस्था आणि जनसुरक्षा विधेयकावर टीका केली. ते म्हणाले, चड्डी-बनियन किंवा चड्डी-टॉवेल गँगचे व्हिडीओ महाराष्ट्रात फिरत आहेत. आता मंत्रीही सुरक्षित राहिलेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मंत्र्यांच्या बेडरूमपर्यंत सायबर सुरक्षेची यंत्रणा पह्डली गेली आहे. डिजिटलायझेशनचा धोका मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे.
आयटीच्या नोटिसीनंतरही मंत्र्याच्या घरात नोटांची बॅग
जाहीर कार्यक्रमांमध्ये मंत्रीच सांगतात की, पैसे कमी पडले तर आम्ही देऊ. दुसरीकडे आयकर विभाग अशा मंत्र्यांना नोटीस देतो. मात्र, आयटी विभागाच्या नोटिसीनंतरही धीट मंत्री पैशांच्या
बॅगा घरात ठेवतात, असे परब म्हणाले.