माय फ्रेंड गणेशानंतर आता लव्ह यू शंकर

माय फ्रेंड गणेशा या ऍनिमेटेड फिल्मनंतर आता अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी लव्ह यू शंकर ही धार्मिक, मैत्रीच्या बंधनावर आधारित ऍनिमेटेड फिल्म लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांच्या त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव रूईया असून एसडी वर्ल्ड फिल्म्स प्रॉडक्शनच्या सुनीता देसाई या निर्मात्या आहेत. 19 एप्रिलला हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत रिलीज होईल.