आधी ब्रिटीशांची परवानगी आता अमेरिकेची, आपला देश खरंच स्वतंत्र आहे? अंजली दमानिया यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने शुक्रवारी हिंदुस्थानला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी देत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी शुक्रवारी याबाबत ट्विट केले. अमेरिकेच्या या परवानगीवरून सध्या मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

”ब्रिटिश गोरे गेले आणि आपण स्वतंत्र झालो असं आपण मानतो… पण आता काय? आता अमेरिका ठरवणार भारताने रशियाकडून तेल किती दिवस विकत घ्यायचं? ’30 दिवसांची परवानगी’ म्हणे! वा! म्हणजे आधी ब्रिटिशांची परवानगी घ्यायचो, आता अमेरिकेची? भारत खरंच स्वतंत्र आहे की अजूनही कुणाच्या ‘परवानगी’वर चालतोय? असा संतप्त सवाल त्यांनी ट्विटरवरून केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनीही साधला निशाणा

“हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करावे की नाही, हे ठरवणारा अमेरिका कोण? आणि हिंदुस्थानला अमेरिकेच्या परवानगीची गरजच काय?” असा संतप्त सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.