अंकिता रैनाची आगेकूच, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस पात्रता फेरी

ऑस्ट्रेलियन ओपन या टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत सहभागी होण्याचे अंकिता रैनाचे स्वप्न या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदुस्थानच्या या अक्वल टेनिसपटूने कॅटरीना झवातस्का हिला महिला एकेरीत पराभूत करीत पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरूष एकेरीत मात्र रामकुमार रामनाथन याला पराभवाचा सामना करावा लागला.

अंकिता रैना हिने कॅटरीना झवातस्का हिचे कडवे आव्हान 6-2, 2-6, 6-3 अशा तीन सेटमध्ये परतवून लावले आणि पुढे पाऊल टाकले. अंकिता रैना ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी सहाव्यांदा प्रयत्न करीत आहे. आता ती फक्त एक पाऊल दूर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या