
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांच्यासह 9 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने रमेश कदम यांच्यासह नऊ जणांवर आरोप निश्चित केले असून त्यांच्या विरोधात खटला सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माजी आमदार रमेश कदम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी बोगस लाभार्थी दाखवून सुमारे 313 कोटींचा घोटाळा केला. या अपहार प्रकरणी पीएम एल ए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर या प्रकरणी रमेश कदमांसह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने त्यांना पक्षातून निलंबित देखील केले. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या समोर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने आरोप मान्य आहेत का अशी विचारणा सर्व आरोपींना केली आरोपींनी नकार दर्शवताच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले. आरोप निश्चित केल्याने खटला सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

























































