मोठा निर्णय जाहीर करत शरद पवारांनी दिलं अजित पवारांच्या टिकेला उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करत पक्षातून पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टिका करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या वयावरून त्यांनी सतत टीका सुरू ठेवली आहे. मात्र शरद पवारांनी एक मोठा निर्णय जाहीर करत या टिकेला उत्तर दिलं आहे. खासदारकीची ही टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरवलं आहे. माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळं मी तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथं पाठवलंय तिथं मी काम करू नको का? माझ्या वयावर सातत्यानं बोललं जातं. मी 1967 पासून राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथं मी काम करत राहणार आहे’.

शरद पवारांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांना सणसणीत उत्तर मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.